सहज सुचलंय म्हणून लिहतोय



वॉल्वो बस मध्ये बसल्यावर घ्यावयाची काळजी 

अपघात कधी सांगून येत नाही. त्यामुळे वॉल्वो मध्ये बसताना संकटकालीन दरवाजा (Emergency Exit) कसा वापरतात याची पहिलेच चालकाकडे विचारपूस करावी कारण दुसऱ्या कुठल्याही वाहनात खिडकीतून बाहेर पडता येते पण वॉल्वो मध्ये नाही.
उत्तर :- संकटकालीन दरवाजाच्या दोन्ही बाजूस एक एक हातोडा असतो त्याचा वापर संकटकालीन दरवाजा तोडन्यास करावा.


 मराठीला अद्यापही अभिजात भाषेचा दर्जा नाही

अभिजात भाषा म्हणजे प्राचीन भाषा.केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व सांस्कृतिक मंत्रालयामार्फत अभिजात भाषांचा दर्जा दिला जातो. तो दर्जा आतापर्यंत फक्त तामिळ, तेलुगू, कन्नड या भाषांनाच मिळाला आहे.मराठीपेक्षा  अधिक लोकसंख्येख्या बंगाली, हिंदीलाही  अद्याप हा दर्जा नाही. मल्याळम्साठी प्रयत्न होऊनही तो नाकारण्यात आला आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मराठी अभिजात भाषा समिती झगडत असून त्यांनी आतापर्यंत खालीलप्रमाणे दस्तेवज मिळवले आहेत. मराठी हा महाराष्ट्री या प्राचीन भाषेचा अपभ्रंश आहे आणि महाराष्ट्रीला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्री ही संस्कृतची कन्या नसून संस्कृतची समकालीन भाषा आहे, हे ग्रांथिक व भाषिक पुराव्यांनी आता सिद्ध करणे शक्य होणार आहे.

मराठी प्राचीन असल्याचे सिद्ध करणारे पुरावे

महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री भाषांत 1 ते 5-6 व्या शतकापर्यंतची दहा हस्तलिखिते उपलब्ध आहेत

जैन महाराष्ट्रीतील विमलसुरींचे पौमचरिऊ पहिल्या शतकातील.

कालिदासाचे ‘शाकुंतल’ 4 थे शतक

शूद्रकाचे मृच्छकटिक 6 वे शतक

प्रवरसेनाचे सेतुबंध 7वे शतक

2500 वर्षांपूर्वीची 80 हस्तलिखिते  


वरील माहितीसाठी आभार : http://divyamarathi.bhaskar.com


  

माझा अनुभव


जेव्हा मी कुठल्याही नवीन व्यक्तीला भेटतो मग थोडी ओळख होते.मग ती व्यक्ती विचारते "तुम्ही कुठले ?"
याचे उत्तर कसे द्यावे मला कळत नाही कारण मी त्याला उत्तर देतो बुलढाणा.समोरची व्यक्ती थोडी गोंधळते कारण मुळात बुलढाणा हा जिल्हा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे हे त्यांना माहित नसते आणि हि वस्तुस्तिथी आहे.(पुणे आणि मुंबईच्या लोकांसाठी महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि पुणे)एक अजून गमतीदार प्रसंग म्हणजे मी "बुलढाणा "सांगितल्यावर पुढचा प्रश्न लोकांचा असतो तो म्हणजे हे नागपूर जवळ आहे का आणि किंवा मग औरंगाबादजवळ आहे का? हि लोकांची महाराष्ट्राबद्दलची माहिती त्यामुळे तालुक्यांची नावे सांगणे तर दूरच.



चंद्रपूर - भारतातील सर्वात प्रदूषित शहर

चंद्रपूर मध्ये घुग्गुस येथे कोळश्याच्या खाणी आहेत. शिंदोला येथे सिमेंटचे कारखाने, वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड (भारत सरकारची नवरत्न कंपनी) च्या बऱ्याच कोळश्याच्या खाणी चंद्रपूर जिल्यात आहेत आणि काही लोकांच्या स्वतःच्या कोळसा खाणी आहेत.त्यात अजून भर म्हणजे चंद्रपूरमध्ये असणारा औष्णिक विद्युत केंद्र.तुम्ही जर फक्त फिरायला जरी बाहेर पडलात तरी तुमचे अंगावर कोळशाचे कण जमा होतील. खरे तर जिथे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड असेल तिथल्या जवळपासच्या गावात विकासाची जबाबदारी हि त्या कंपनीची असते.पण मुळात चंद्रपूर मध्ये बरोबर रस्ते सुद्धा नाहीत.आता पुन्हा सिमेंटचा प्रकल्प चंद्रपूर मध्ये जाहीर झाला आहे. उन्हाळ्यातील तिथले तापमान ४१ ते ४५ इतके असते. (महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणजे सगळ्यात जास्त वीज निर्मिती महाराष्ट्रात होते पण उन्हाळ्यात तालुक्याच्या ठिकाणी ५ तास भारनियमन आणि गावात तर चक्क १२ तास भारनियमन करावे लागते .)


लग्न प्रश्नावली (मित्राचा अनुभव )


गावात काँप्युटरला "कॅम्पुटर" असे संबोधतात.एक मित्र मुलगी पाहण्यासाठी गावात गेला.मुलगा बी.एस्सी तर मुलगी जेमतेम बारावी शिकलेली. मुलाने पहिला प्रश्न विचारला जो सगळेच विचारतात "स्वयंपाक  करता येतो का?".उत्तर होते हो आणि मुलगी दिसायला सुंदर होती.(गावात आणि शहरात सुंदर मुलगी याची व्याख्या वेगळी असते).प्रश्न क्रमांक दोन "बारावी नंतर अजून काही शिकलीस?".ती म्हणाली MSCIT चा कोर्स केलाय. मग ह्या पठ्याने काय विचारावे तर "कीबोर्डवर प्रिंट स्क्रीन बटन कुठे असते?"(मुलगी हॅंग)


विहणीची पंगत 


विहणीची पंगत नावाची गम्मत प्रत्येक लग्नात असते.कारण या पंगतीत बसण्यासाठी बरेच लोक आतुर असतात. या पंगतीत गोड पदार्थ जास्त असतात आणि जागा मात्र मोजक्याच असतात. (त्यात कुणीतरी एक मुलगा खुर्चीवर बसलेला असतो आणि कुठलीतरी बाई मला मुलाकडच्यांनी पंगतीत बोलावले नाही म्हणून रूसलेली असते.कुणीतरी कार्यवाहक म्हणजे लग्नात पुढे पुढे करणारे त्या मुलाला सांगतात बेटा उठतोस का त्या काकूंना बससायचे आहे तिथे )काही मंडळी सकाळच्या पंगतीत जेवतात आणि थोडेशे म्हणून मग विहिणीच्या पंगतीला सुद्धा बसतात ज्यामुळे जागा कमी होतात.केटरींग वाल्याला सांगितलेल्या आकड्यांनुसार नेहमी जेवणार्‍यांची संख्या जास्त भरते आणि मग काही पदार्थ आधीच संपलेले असतात. मग केटरींग वाला ताटानुसार पैसे घेतो(उकळतो).एकतर आधीच काही नातेवाईकाना आहेर म्हणून दिलेले कपडे आवडलेले नसतात(बायांना लग्नात मिळालेल्या आहेरच्या साड्या कधीच आवडत नाही ).पण पुण्यासारख्या ठिकाणी आजकाल वन डे लग्न पद्धती असल्यामुळे तिथे ही पंगत होते का ही शंका आहे कारण मुळात पुण्यासारख्या ठिकाणी लग्न हे एका छोट्याश्या हॉल मध्ये होतात ही प्रचिती येती जेव्हा लग्न लागताना नातेवाईक हॉलच्या बाहेर उभे राहून अक्षता टाकत असतात.


किसान कॉल सेंटर

शेत्कर्‍यांसाठी पिकांची माहिती, रोग आणि त्याचा प्रतिबंध, उपयुक्त बी- बियाणे आणि अशा सर्व प्रकारची माहिती किसान कॉल सेंटरच्या टोल फ्री "18001801551" या क्रमांकावर उपलब्ध आहे. हा क्रमांक तुम्ही सोमवार ते शनिवार सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लावू शकता. ही सुविधा भारत सरकारकडून 21 जानेवारी 2004 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. तरी सदर सेवेचा लाभ घ्यावा.

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला
१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

४ वेद + ६ वेदांगे + न्याय + मीमांसा + पुराणे + धर्मशास्त्र.... अश्या एकूणचौदा

वेद :
१. ऋग्वेद
२. यजुर्वेद
३. सामवेद
४. अथर्ववेद

सहा वेदांगे
१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.

१. न्याय,
२. मीमांसा,
3. पुराणे
४. धर्मशास्त्र.

चौसष्ट कला

१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
सौजन्य : अमित कुळकर्णी


संस्कृत भाषा काही वर्षांनी कालबाह्य होणार 


आपले सर्व ग्रंथ म्हणजे पुराण,वेद,उपनिषदे,स्तोत्र वगैरे हे संस्कृत मध्ये आहेत. पण आपल्याला संस्कृत भाषा येत नसल्यामुळे त्याचा अर्थ कळत नाही. याचे कारण म्हणजे पहिली ते दहावी इयत्तेत दहावीला पन्नास किंवा शंभर गुणांचे संस्कृत भाषा असते तीही पर्यायी भाषा म्हणून(पुस्तक छोटे असल्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळणे शक्य होते) . संस्कृत तर सोडाच ज्ञानेश्वरी शुद्धा आपल्याला मराठीत लिहलेली कळत नाही. याउलट बाहेरच्या देशातील विद्यापीठात संस्कृतचा वेगळा विभाग आहे. काही जुने ग्रंथ त्यांनी जपून digitised केलेले आहेत(पीडिएफ मध्ये ). हीच परिस्थिती आयुर्वेदाची सुद्धा आहे. त्यामुळे संस्कृत नामशेष व्यहायच्या आधी काहीतरी पाऊले उचलली पाहिजेत.



6 comments:

  1. Really i too dont know that where is emergency exit in volvo.

    I knew that buldhana is in maharashtra but dint knew exact location. And this situation is same with me too, when i say i am from osmanabad. One of my friend even asked that whether it is in pakistan???

    लग्न प्रश्नावली (मित्राचा अनुभव )-> I doubt whether your friend was none other than you.... ;)

    ReplyDelete
  2. ( विहीणीची पंगत ) --> खूप आवडले . मुलीच्या बापाच्या आयुष्यतली एक शोकांतिका असते मुलीचे लग्न. एक तर मुलाकडच्यांना काही काम नसते रूसण्याशिवाय आणि मुलीच्या बापचा पाणउतारा करायला येतात नेमके शेवटच्या पंक्तीत जेवायला .

    ReplyDelete
  3. अहो, पंगतीत प्रत्येक वेळेस दुसर्‍यांसाठी उठवला जाणारा मुलगा म्हणजे मीच, अमोल कुलकर्णी

    ReplyDelete
  4. अमोल तुझ्याही लग्नात दुसर्‍यांसाठी तुलाच उठावे लागले का रे ?

    ReplyDelete
  5. आपण आपली संकृती जतन केली पाहिजे हि आपली गरज आहेत

    ReplyDelete